Pages

Wednesday, December 15, 2010

अंदाज

मला अन न कळले, कधी अंदाज चांदण्यांचे
मिळती हजार सल्ले, येथे स्वस्तात बावळ्यांचे

येथे उजेड सोबतीला, आहेत काजव्यांचे
भेटीस सूर्य यावा, स्वप्न हेच, रोज दिवसांचे

पावसास आज येथे, वेध आहेत चातकांचे
केव्हाच पण सरले, ऋतू ते गारव्यांचे

Tuesday, December 14, 2010

परके

अन तुला कधी न कळले, सूर माझिया भावनांचे
काळोखल्या मार्गांवर, भंग स्वप्न मुक्या मनाचे

कधी न काळात दाटले, मेघ तुझिया आठवणींचे
माझ्या अंगणात पण, फुल वळवाच्या पावासांचे

ते उधार घेतलेले, घर स्वस्तात सावल्यांचे
अनोळखी अन परके, पण व्यवहार अपुल्यांचे