Pages

Wednesday, June 22, 2011

कधीतरी...

होईल एक नवी सुरवात,होईल पुन्हा नवी बरसात
सरून जाईल हिही रात, रात्रही टाकेल कधीतरी कात

पसरेल आकाश नव्या स्वप्नांचे
स्वप्नातही असेल स्वप्न अपुल्यांचे
नसेल कधी वादळ अप्रिय प्रश्नांचे
शब्दांविना अर्थ कळतील उत्तरांचे

होईल मोकळी पुन्हा वाट, होईल पुन्हा नवी पहाट
सरून जाईल हिही रात, रात्रही टाकेल कधीतरी कात

सुटतील पेच सारे आयुष्यांचे
लागेल प्रत्येक वळण सुखांचे
ग्रहण राहील कुठे सुक्या आसवांचे?
रात्रीस प्रश्न राहतील फक्त काजव्यांचे

असेल आयुष्याला नवी साथ, साथीची असेल औरच बात
सरून जाईल हिही रात, रात्रही टाकेल कधीतरी कात