Pages

Wednesday, January 26, 2011

पुन्हा....

पुन्हा तुझ्या आठवणी क्षितिजावर सांडलेल्या
पुन्हा माझ्या व्यथा मी स्वतःशीच मांडलेल्या

पुन्हा ते आभाळ काळ्या ढगांनी काळवंडलेले
पुन्हा कोरड्या पावसाने डोळे माझे पाणावलेले

पुन्हा त्या घराच्या साऱ्या भिंती हरवलेल्या
पुन्हा साऱ्या भावना रात्री चुलीत जळलेल्या

पुन्हा माझ्या स्वप्नांचे गाव त्या स्वप्नातच भंगलेले
अन आठवांच्या राखेने घर कुणी औरानेच बांधलेले

1 comment:

  1. पुन्हा माझ्या स्वप्नांचे गाव त्या स्वप्नातच भंगलेले
    अन आठवांच्या राखेने घर कुणी औरानेच बांधलेले


    awesome ......

    ReplyDelete