Pages

Friday, September 3, 2010

शापित

सोडूनी आठवांना, एकटाच चाललो मी
जीवनात आज पुन्हा, शापित जाहलो मी

सहस्त्र आरोप्यांचे, आरोप सोसले मी
आरोपाने आज तुझ्या, पुरताच फाटलो मी

कधी तुझ्या प्रश्नांना , उत्तर जाहलो मी
तुझ्यासाठी आज पण, प्रश्नच राहिलो मी

तुझ्या प्रत्येक क्षणांना, स्वतः जाळले मी
चिता शांत झाली तरी, राखेत माखलो मी

No comments:

Post a Comment