जीवनाने आज एक नवीन वळण घेतले होते
अन हे वळणच माझ्या जीवावर बेतले होते
त्या वेड्या बकुळीचे आज तिथे सडे पडले होते
अन पसरलेले गंध सारे नाईलाजाने सडले होते
वादळाने आज शेवटी पक्षाचे घरटेही पाडले होते
अन झाडाखाली मुक्याने ते दगडही हालले होते
अखेरीस जाताना पाय उंबरठ्यापाशी अडले होते
पण थांबलेले पाय उंबरठ्यालाच कुठे कळले होते?
Friday, September 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment