Pages

Sunday, January 2, 2011

जेव्हा.........

जेव्हा घट्ट बांधलेली गाठ, हळूहळू सुटू लागते
जेव्हा हवी असणारी रात, अचानक ढळू लागते
जेव्हा शरीराला सोडून , सावलीही पळू लागते

जेव्हा जुन्या आठवणींचे, आकाश मनी दाटू लागते
जेव्हा एकट्यात शांतता, अजून शांत वाटू लागते
जेव्हा खोटं हसणंही, आपोआप जमू लागते

जेव्हा वाटच पावलांना, एकटं मागे सोडू लागते
जेहा कुणी समोर असताना, चुकाल्यागत वाटू लागते
जेव्हा कुणी आपलंच, अनोळखी होऊ पाहते

तेव्हा मनातलं मनातच, एकदम तुटू लागते
तेव्हा जीवन जगणे, केवळ एक भ्रांत वाटू लागते
तेव्हा जीवन जगणे, केवळ एक भ्रांत वाटू लागते .................

2 comments: