न जाणो का आजकाल मन मनात हसतं
गर्दीत असूनही कधी गर्दीत ते नसतं
तुझ्याशिवाय आजकाल कुठं काय सुचतं
तू समोर नसल्यावर मन मनातच नसतं
न जाणो का आजकाल मन बेधुंद असतं
तुझ्या आठवणीत मनामध्येच बंद असतं
चांदण्यांना विचार गप्पांमध्ये तुझंच नाव असतं
तुझ्याविना चांदणं हे चांदणंही कुठं असतं?
न जाणो का आजकाल स्वप्न एकच दिसतं
स्वप्नात तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नसतं
समोर कुणी नसलं तरी मनात तेच असतं
का न कळो तुला कि प्रेमात होत असंच असतं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment